ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे केंद्रशाळा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

मसुरे केंद्रशाळा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 16 Jan 2024 04:04 PM
वाचन संख्या 107

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या, श्री. दाजीसाहेब प्रभूगावकर जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा मसुरे क्र. १ चे वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण, विक्रम या हस्तलिखिताचे प्रकाशन व मुलांचे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी जि.प.माजी अध्यक्ष श्री. संग्राम प्रभुगांवकर, सिंधुदुर्ग जिल्हाशिक्षण समिती माजी सदस्या तथा जि.प.माजी अध्यक्षा सौ.सरोजताई परब, मसुरे सरपंच श्री.संदीप हडकर, उपसरपंच श्री.राजेश गांवकर,निवृत्त नौसैनिक श्री. धनंजय सावंत, शा. व्य. स. माजी अध्यक्ष तथा पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर,शा. व्य. समिती अध्यक्ष सौ. शितल शैलेश मसुरकर, उपाध्यक्ष श्री.संतोष दुखंडे, शा. व्य. समिती शिक्षणप्रेमी सदस्य श्री. सन्मेश मसुरेकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख श्री. नारायण देशमुख, माजी सरपंच सौ. लक्ष्मी पेडणेकर, ग्राम.पं.समिती सदस्य सौ.भक्ती भोगले, राज्यपुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.शिवराज सावंत, श्री.विनोद सातार्डेकर, श्री.गोपाळ गावडे,सौ.रामेश्वरी मगर ,श्री.नितीन पाटील तसेच शिक्षक, विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी शाळा व विद्यार्थी प्रगती याबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी शाळेची माजी विद्यार्थीनी श्रीम. सीमा नारायण साटम यांच्या एक लाख रु. ठेव रकमेतील व्याजातून, माजी विद्यार्थी केंद्रशाळा मसुरे नं.१ ची दशावतार टिमने ७१५००/- (एकाहत्तर हजार पाचशे) रु. कायमस्वरुपी ठेव व्याजातून तसेच श्री.तारक कांबळी यांनी ठेवलेल्या १५०००/- रु.ठेव, श्रीम.कल्याणी कांबळी मॅडम यांची ५०००/-रु.ठेव,श्री.गुरुनाथ ताम्हणकर सर यांची ५०००/-रु.ठेव तसेच मसुरे ग्रामस्थ ११०००/-रु. ठेवा रकमेवरील व्याजातून गुणी, होतकरु व कलाकार विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तु देऊन गौरवण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी कु. चैतन्य भोगले व आदर्श विद्यार्थीनी व इस्रो सहलीसाठी निवड झालेली कु. श्रेया मगर या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. यावेळी पाककला स्पर्धे मधिल विजेते सौ.ज्योती पेडणेकर, सौ.हेमलता दुखंडे व सौ. आसावरी ठाकुर यांना गौरवण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते विक्रम या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल,श्रीफळ व पुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. तसेच जिल्हा आदर्श गुणवंत पत्रकार पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. दत्तप्रसाद पेडणेकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान मुख्या.सौ. शर्वरी सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत यांनी केले, श्री. विनोद सातार्डेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गोपाळ गावडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी माजी विद्यार्थ्यांचे योगदान लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स