ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
बांदिवडेतील मिलिंद प्रभू यांच्या 'काळी मिरी' प्रकल्पाची 'कृषक भूषण'  भरारी..!

बांदिवडेतील मिलिंद प्रभू यांच्या 'काळी मिरी' प्रकल्पाची 'कृषक भूषण' भरारी..!

प्रकाशन: 14 Jan 2024 06:26 PM
वाचन संख्या 241

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील बांदीवडे येथील मिलिंद प्रभू यांना ‘भारतीय कृषक समाज नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य’ यांच्यावतीने भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंती उत्सवा निमित्त कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा कृषीभूषण पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. राहुरी अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळा व भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अधिवेशन समारंभात सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोकण विभागात मसालापीक काळीमिरीची यशस्वी लागवड केल्याबद्दल सदर पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी भारतीय कृषक समाज नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णविर चौधरी, इपको अध्यक्ष दिलीप संघानी, खासदार विजयसिंह तोमर, राहुरी विद्यापीठ कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील, ज्योती सुरसे, सुभाष नलांगे, लिंगराज पाटील, सुनील चौधरी, राजेश डोंगरा, ऍड अजित देवतिया, संजय राय आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मिलिंद प्रभूंसह डॉ. अनुपमा पात्रीकर , सी. आर. पिंपळकर यांना कृषी भूषण पुरस्कार तर शिवाजी डोळे, अशोक खाडे, बी. टी. गोरे यांचा कृषिरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आभार रंगनाथ भापकर यांनी मानले. हा पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल मिलिंद प्रभू यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स