ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुरत्न मधून मिळणार प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री ; मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांची माहिती.

सिंधुरत्न मधून मिळणार प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री ; मालवण तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव यांची माहिती.

प्रकाशन: 11 Jan 2024 12:22 PM
वाचन संख्या 468

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण फळ पिकाखालील क्षेत्र साधारणतः १४२९४७ हे. आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फळ पिकाखालील क्षेत्र असूनही फळांची काढणी करताना साधारणतः १५ ते २० टक्के उत्पन्न हाताळणी करताना शेतकर्याचे नुकसान होते. त्यामुळे फळपिकांचे काढणीत्तोर नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना सन २०२३-२४ अंतर्गत प्लास्टिक क्रेट्स व प्लास्टिक ताडपत्री खरेदी करीता ७५ टक्के अनुदान तत्वावर मंजुरी देण्यात आली आहे. सदर योजनेस पात्र शेतकर्याकडे ०.२० हे. क्षेत्र फळपिकाखालील असावे. एका कुटुंबातील एकाच लाभार्थ्यास लाभ देण्यात येईल. अनुसुचीत जाती व अनु. जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकर्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग] सिंधुदुर्ग यांची जिल्हा स्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर रु. ४८०/- प्रति प्लास्टिक क्रेट्स आणि रु.२०००/- प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदान प्रमाणे सदर प्लास्टिक क्रेट्स साठी जास्तीत जास्त रु. ३६० प्रति क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री साठी जास्तीत जास्त रु. १५०० प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. तसेच एका शेतकर्यास जास्तीत जास्त १५ क्रेट्स व १ ताडपत्री याप्रमाणे कमीत कमी एका शेतकर्याने १० क्रेट्स व १ ताडपत्री खरेदी करणे बंधनकारक राहील. सदर प्लास्टिक ताडपत्रीचे आकारमान ६ मी x ४ मी इतके असणार आहे. सर्व साहित्य BIS / ISI प्रमाणित असणार आहे.

तरी सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालय मालवण अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त शेतकर्यांनी दि. १९.०१.२०२४ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी मालवण श्री एकनाथ गुरव यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स