ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही २२ जानेवारीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली माहिती.

अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही २२ जानेवारीला धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ; अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली माहिती.

प्रकाशन: 10 Jan 2024 12:21 AM
वाचन संख्या 79

मसुरे | प्रतिनिधी :अयोध्येतील ऐतिहासिक नूतन श्रीराम मंदिर निर्मितीनंतर येत्या सोमवार दिनांक २२ जानेवारी रोजी विक्रम संवत २०८०, शालिवाहन शके १९४५, मिती पौष शुक्ल द्वादशी रोजी अभिजीत मुहूर्तावर, मृगाशीरा नक्षत्रात दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठापना होवून अभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा संपूर्ण देशवासियांनी धर्मोत्सव म्हणून साजरा करावा असे आवाहन केंद्र शासन व राम मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या मंगल क्षणाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरातील ४ लाखांपेक्षा अधिक विविध देवी देवतांच्या मंदिरांमध्येही २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यानिमित्ताने येथील अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोडवरील पुरातन श्रीराम मंदीरातही मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीस अभिषेक, रामनाम जप, सत्संग महिला भजनी मंडळाची भजन सेवा, किर्तन, प्रसाद वाटप, दीपोत्सव इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन संपूर्ण देशात साजरा होणाऱ्या या धर्मोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स