ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे ट्रस्टच्या जाचक अटीसंदर्भात ग्रामसभेतील ठरावाचे सहा. धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना पत्र ; सरपंच जेराॅन फर्नांडिस , ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांतर्फे दिले गेले पत्र.

इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे ट्रस्टच्या जाचक अटीसंदर्भात ग्रामसभेतील ठरावाचे सहा. धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना पत्र ; सरपंच जेराॅन फर्नांडिस , ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांतर्फे दिले गेले पत्र.

प्रकाशन: 09 Jan 2024 09:12 PM
वाचन संख्या 786

माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर हे पत्राचे सूचक तर अनुमोदक अनिल कारंजे.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील श्री देव रामेश्वर देवस्थान कसबा आचरे ट्रस्टच्या जाचक अटींसंदर्भात ग्रामसभेतील ठरावाबाबत सहा. धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना २४ डिसेंबरच्या आचरा ग्रामसभेत सर्वानुमते झालेल्या ठरावाचे पत्र आचरा ग्रामपंचायत सरपंच जेराॅन फर्नांडिस, ग्रामविकास अधिकारी यांच्या तर्फे देण्यात आले आहे. या ग्रामसभेला आचरा वासियांची लक्षणीय उपस्थिती होती व इनामदार श्री देव रामेश्वर कसबा आचरे ट्रस्टमध्ये प्रत्येकी ८ महसुली गांवाप्रमाणे कायमस्वरूपी सदस्य मिळणे व देवस्थान कमिटीने सदस्रपदासाठी जाचक व भावनीक अटी केल्याबद्दल ग्रामस्थांनी दिलेल्या अर्जाबाबत ठराव क्र. ९ सर्वानुमते मंजूर केला गेला होता त्याची अधिकृत माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांना देण्यात आली आहे व याची प्रत धर्मादाय आयुक्त भवन मुंबई व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय कोल्हापुर यांनाही पाठविली गेली आहे. या ठरावाचे सूचक आचरा ग्रामपंचायत माजी सरपंच व आचरा ग्रामस्थ मंगेश उर्फ जिजा टेमकर तर अनुमोदक म्हणून अनिल कान्होबा कारंजे आहेत

या वेळी सरपंच जेराॅन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, यांच्यासह माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर, नारायण कुबल, श्यामसुंदर घाडी, जयंत पांगे, अर्चन उर्फ छोटू पांगे व पांडुरंग वायंगणकर सोबत उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स