ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक, भटके विमुक्तांना सर्व प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठीच्या अभियान ; जिल्हा प्रभारी पदी नवलराज काळे.

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक, भटके विमुक्तांना सर्व प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठीच्या अभियान ; जिल्हा प्रभारी पदी नवलराज काळे.

प्रकाशन: 10 Jan 2024 10:31 AM
वाचन संख्या 123

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार निवड..!

वैभववाडी | प्रतिनिधी : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या सूचनेनुसार संपुर्ण महाराष्ट्रात आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक, भटके विमुक्तांना सर्व प्रमाणपत्रे मिळवून देण्यासाठीचे अभियान राबविण्यात येत आहे या अभियानासाठी जिल्हा प्रभारी पदी भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची निवड करण्यात आली आहे. या अभियानामध्ये भटके विमुक्त समाजाच्या वाड्या-वस्त्यांमध्ये व तांडयावर राशन कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड व आयुष्यमान भारत कार्ड, उज्वला गॅस अभियान राबविण्यात येत असुन भाजपा भटके विमुक्त आघाडी तर्फे जिल्हा, तालुका, वाड्या – वस्तांपर्यत, तांडयांवर हे अभियान प्रभावपणे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना राबवणे आहे.
भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष हे या अभियानाचे प्रमुख असुन जिल्हा, तालुका व गाव, वस्ती, तांडयापर्यंत अभियान प्रमुख नेमणूक करून हे अभियान यशस्वीपणे राबवायचे आहे. या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांत या अभियानासाठी प्रभारी नियुक्ती जाहीर करण्यात आल्या असून या निवडीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नवलराज काळे यांची प्रभारी पदी निवड झाली आहे. लवकरच जिल्ह्या कर्यारणी ची रचना करून कामाला सुरुवात होईल असा आश्वासन नवलराज काळे यांनी वरिष्ठांना दिले आहे. भारतीय जनता पार्टी भटके व मुक्त समाजासाठी प्रभाव पणे योजना राबवत आहे.

अशा उपक्रमामुळे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळेल व समाज प्रगतीकडे जाईल असा काळे यांनी विश्वास व्यक्त केला. अशा प्रकारचे अभियान भटके विमुक्तांना देऊन राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत बावनकुळे व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय राहुल भैया केंद्रे यांची नवलराज काळे यांनी आभार व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स