कलाशिक्षक समीर चांदरकर यांचे राज्यस्तरीय सुयश..!
मसुरे | प्रतिनिधी : मुंबईतील सुप्रसिद्ध प्रसार माध्यम समूह व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमपीसीबी प्रस्तुत महा एमटीबी इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट राज्यस्तरीय स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे कलाशिक्षक श्री समीर चांदरकर यांनी आपल्या निवासस्थानी साकारलेल्या पर्यावरण पूरक सजावटीला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त झाला. चांदरकर कुटुंबीयांनी यावर्षी गणेश सजावट करताना कोकणातील मातीचे घर त्यावर वारली पेंटिंग ,गवताचं छप्पर, आणि शेणाने सारवलेली जमीन त्यावर कणा रांगोळी असा देखावा साकारलेला होता. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे १२०० स्पर्धक सहभागी झाले.रोख रुपये २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार सोहळा डॉ. अविनाश ढाकणे, सदस्य महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,सुश्रुत चितळे अध्यक्ष भारतीय विचार दर्शन,किरण शेलार संपादक, मुंबईतील सुप्रसिद्ध प्रसारमाध्यम संपादक यांच्या प्रमुख उपस्थितीत वडाळा – मुंबई येथे संपन्न झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)