ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदिवडेत विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

बांदिवडेत विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न ; आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती.

प्रकाशन: 08 Jan 2024 08:54 PM
वाचन संख्या 353

आमदार फंड, बजेट व खासदार फंडाच्या माध्यमातून सुमारे १ कोटीचा विकास निधी केला होता मंजूर.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बांदिवडेतील विविध विकास कामांची भूमिपूजने आज ७ जानेवारीला आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. बांदिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार फंड, बजेट व खासदार फंडाच्या माध्यमातून सुमारे १ कोटीचा विकास निधी देण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या खासदार फंडातून मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी ते भगवंतगड जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १० लाख रु. मंजूर केले आहेत.त्याबद्दल ग्रामस्थांनी आभार व्यक्त करत आ. वैभव नाईक यांचा सत्कार केला.

यावेळी कुडाळ विधानसभा संपर्क प्रमुख संग्राम प्रभुगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, मसुरे विभाग प्रमुख राजेश गावकर, बांदिवडे सरपंच आशु मयेकर, मसुरे सरपंच संदीप हडकर, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, पप्पू परुळेकर,आयवान फर्नांडिस बांदिवडे ग्रा. प.सदस्य स्वप्नील मुणगेकर, ग्रा. प.सदस्य पुष्पक घाडीगावकर, ग्रा. प.सदस्य नारायण परब, ग्रा. प.सदस्य श्रुती गावकर, सुभाष मुणगेकर, बबन चौकेकर, प्रफुल्ल हडकर, बबलू मिठबावकर, योगेश मेस्त्री, कालिदास मुणगेकर, विकास आचरेकर,विनायक गावकर, अभिषेक मयेकर, समर्थ मिठबावकर, नरेश मसुरकर आदींसह बांदिवडे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स