ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संतोष प्रल्हाद मुणगेकर कालवश ; श्री भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून होते कार्यरत.

संतोष प्रल्हाद मुणगेकर कालवश ; श्री भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे शिक्षकेतर कर्मचारी म्हणून होते कार्यरत.

प्रकाशन: 06 Jan 2024 05:33 PM
वाचन संख्या 151

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि स्वर्गीय विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेसचे शिक्षकेतर कर्मचारी संतोष प्रल्हाद मुणगेकर (४४वर्ष) यांचे शुक्रवारी मुंबई येथे के. ई. एम. हॉस्पिटल येथे उपचारा दरम्यान अल्प आजाराने निधन झाले. मनमिळाऊ आणि शांत स्वभावाच्या संतोष यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करण्यात येत आहे.

दोन महिन्यापूर्वीच त्यांच्या वडिलांचे वार्धक्याने निधन झाले होते. संतोष यांच्या पाश्चात पत्नी, मुलगी, वहिनी, काका, काकी, पुतणे,पुतण्या असा परिवार आहे. श्री भगवती हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे शनिवारी शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुंबई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स