ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
सिंधुदुर्ग प्रेस क्लबकडून पत्रकार दिन झाला साजरा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुदुर्ग प्रेस क्लबकडून पत्रकार दिन झाला साजरा..!

प्रकाशन: 06 Jan 2024 05:45 PM
वाचन संख्या 75

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता ही दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिप्रेत आहे.पत्रकारांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध आवाज उठवला असून हा वसा असाच कायम ठेवावा येथील पत्रकार सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात असे गौरवोद्गार सावंतवाडीचे प्रांताधिकार प्रशांत पानवेकर यांनी काढले. पत्रकार दिनानिमित्त सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग प्रेस क्लब च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रेस क्लब च्या वतीने घरोघरी वृत्तपत्र वितरित करणाऱ्या सहा जणांना थंडी साठी सुरक्षा स्वेटर प्रदान करण्यात आली आहे. यावेळी भाजपयुवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमसावंत भोसले, तहसिलदार श्रीधर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, कोकण महिला उपाध्यक्षा अर्चना घारे, परब शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, बबन राणे गजानन नाटेकर, पुंडलिक दळवी, ज्येष्ठ पत्रकार, अभिमन्यू लोंढे, विजय देसाई, प्रेस क्लब चे पहिले जिल्हाध्यक्ष सिताराम गावडे, जिल्हाध्यक्ष अनंत जाधव,हेमंत खानोलकर अरूण वझे उपस्थित होते. यावेळी पानवेकर म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकारिता ही सर्वाना बरोबर घेऊन जाणारी आहे.असेच काम सर्वानी करावे असे आवाहन त्यांनी केले तसेच सावंतवाडीतील पत्रकार हे सर्व सामान्य माणसाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे स्पष्ट केले.

लखमसावंत यांनी सावंतवाडीतील पत्रकार हे राजकारणात नव्याने येणार्या ना संधी देत असतात हे बघून बरे वाटते अशा शब्दात कौतुक केले. बबन साळगावकर यांनी तर आपण प्रेस क्लब च्या पहिल्या दिवसापासून सोबत आहे.ही सोबत अशीच कायम राहिल असे सांगितले त्यामुळेच सर्वानी नेहमी जनतेला अभिप्रेत काम करावे असे आवाहन केले.आपण सदैव तुमच्या सोबत असल्याचे ही त्यांनी सांगितले. अशोक दळवी यांनी येथील पत्रकारांना धन्यवाद देतना सर्वानी मिळून विकास कामात सहकार्य करता तसेच सहकार्य भविष्यात ही करावे आणि या जिल्ह्याला विकास कामात अग्रेसर राहुया असे आवाहन ही दळवी यांनी यावेळी केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले अर्चना घारे – परब पत्रकार अभिमन्यू लोंढे, सिताराम गावडे यांनी ही आपले विचार मांडले तसेच पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व पत्रकार काय करू शकतो हे पटवून दिले.यावेळी प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष अनंत जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाला पत्रकार उमेश सावंत, राकेश परब संजय भाईप लक्ष्मण आढाव, संदेश पाटील आनंद धोंड, शैलेश मयेकर मकरंद मेस्त्री, मदन मुरकर, संदेश कारिवडेकर, नयनेश गावडे, संजय पि॓ळणकर, संदिप राऊळ, विशाल सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे सचिव राकेश परब यांनी तर आभार संजय पिळणकर यांनी मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स