ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरूच ; माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या सोबत चौके व परिसरातील ४ पदाधिकारी मनसे मधून पडले बाहेर.

मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरूच ; माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या सोबत चौके व परिसरातील ४ पदाधिकारी मनसे मधून पडले बाहेर.

प्रकाशन: 05 Jan 2024 07:00 AM
वाचन संख्या 189

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसे व मनविसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या राजीनाम्याचा सत्राचा मालवण तालुक्यातही प्रभाव दिसून येऊ लागला आहे. माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या सोबत संघटनात्मक व पक्ष कार्यात सक्रीय असणारे चौके शाखाध्यक्ष गणेश गावडे, साळेल शाखाध्यक्ष सचिन गावडे, उपशाखाध्यक्ष दिनेश कदम, मनविसे माजी तालुका अध्यक्ष विनायक गावडे या ४ पदाधिकारी मनसे पक्षातून बाहेर पडले आहेत.

चौके व परिसरात, माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली हे चौघे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली काही वर्षे विविध सामाजिक प्रश्नांवर सतत कार्य व उपक्रम चालू ठेवले होते परंतु अलिकडील काळात मनसेचे पक्षनिरीक्षक व इतर काही जणांच्या मनमानीमुळे आपण मनसे सोडत असल्याची त्यांनी प्रतिक्रीया दिल्याचे सूत्रांकडून समजते आहे. माजी तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट करत त्यांच्या राजीनाम्याला एकप्रकारे पाठिंबा देऊनच ह्या चौघांनी राजीनामा दिला आहे.

काल मनविसेचे माजी उप जिल्हा प्रमुख तसेच मालवण, तारकर्ली, देवबाग येथील परिणामकारक युवा मनविसे नेतृत्व व क्रियाशील कार्यकर्ते प्रतिक कुबल यांनीही राजीनामा दिला होता आणि आता चौके परिसरातील या ४ युवा पदाधिकार्यांच्या राजीनाम्याने मनसे मधिल अनुभवी व युवा कार्यकर्त्यांच्या फळीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स