ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात ; आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत.

तळवडे सरपंच गोपाळ रुमडे यांनी केला भाजपात ; आमदार नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत.

प्रकाशन: 04 Jan 2024 01:21 PM
वाचन संख्या 79

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या तळवडे ग्रामपंचायत सरपंच गोपाळ सूर्यकांत रुमडे यांनी भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. कणकवली येथे हा पक्षप्रवेश झाला.

यावेळी शक्ती केंद्रप्रमुख तथा माजी सरपंच पंकज दूखंडे, गडीताम्हाणे शक्ती केंद्रप्रमुख अमित कदम आदी उपस्थित होते. आमदार नितेश राणे यांच्या विकास कामाची शैली पाहून आपण प्रभावित झालो आहे. देवगड तळवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच मी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करत असल्याचे सरपंच गोपाळ रूमडे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स