ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आर श्रीजेश..द वाॅल!(विशेष क्रिडावृत्त)

आर श्रीजेश..द वाॅल!(विशेष क्रिडावृत्त)

प्रकाशन: 05 Aug 2021 10:45 AM
वाचन संख्या 118

ठाणे | विशेष :आज भारताला टोकियो ऑलिंपिक्समध्ये हॉकीमध्ये कांस्यपदक मिळाले.
देशभर जल्लोषाचे वातावरण आहे.
या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे भारतीय गोलकीपर श्रीजेश याचा.
या स्पर्धेत अप्रतिम बचावाचे प्रदर्शन करताना मजबूत इराद्याने आणि अभूतपूर्व कौशल्याने भिंतीसारखा गोलपोस्टसमोर श्रीजेश उभा राहिला. तो गेली 15 वर्षे सिनियर भारतीय हॉकी संघाला सेवा देतोय.
गेली 10 वर्षे तो भारतीय हॉकी संघाचा नियमित गोलकीपर म्हणून उत्तम कामगिरी बजावतोय. http://localhost/news/public/uploads/2011च्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक्स अडवून संघाला मिळवून दिलेला विजय असो की http://localhost/news/public/uploads/2014 एशियाड मध्ये अंतिम सामन्यात पुन्हां पाकिस्तानविरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक्स अडवून संघाला मिळवून दिलेला विजय असो, श्रीजेशची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे.2016 मधील रिओ ऑलिंपिक्स मध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करताना श्रीजेश भारताला उपउपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला होता. भारत सरकारने श्रीजेश यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून भारतीय हॉकी संघाच्या यशाने आपण खूप आनंदीत आहोतच…आणि अभिमानी सुद्धा !

( लेखक )विक्रांत गोपीचंद चव्हाण ,ठाणे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स