चिंदर सेवा संघाच्यावतीने सिविल इजिंनीयर (CGPI) परिक्षा उत्तिर्ण प्रथमेश तावडे यांचा सत्कार
विवेक परब | चिंदर :२०२०–२१ मध्ये सिविल इंजिनियर (CGPI) परिक्षा उत्तिर्ण चिंदर गावठणवाडी येथील प्रथमेश जयवंत तावडे यांचा सत्कार चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष श्री.संदिप पारकर यांच्या हस्ते आज करण्यात आला. ओरोस येथील मेट्रोपोलीटन इन्स्टिट्यूट आँफ टेक्नॉलॉजी अँड मँनेजमेट (Metropolitan Institute of Technology and management) येथे शिक्षण घेऊन प्रथमेश यांनी १० पैकी ७.५९ पाँईट मिळवत हे धवल यश प्राप्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि समारोप सिध्देश गोलतकर यांनी केले यावेळी चिंदर सेवा संघाचे उपाध्यक्ष विवेक(राजु)परब, खजिनदार गणेश गोगटे, सहखजिनदार सचिन चिंदरकर, भूषण दत्तदास, आशिष कोरगांवकर, ओमकार गोलतकर, प्रसाद टोपले, धनंजय नाटेकर, शशीकांत नाटेकर हे उपस्थित
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)