ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या मागणीची आ. नितेश राणेंनी घेतली दखल ; वैभववाडी - एडगांव वायंबोशी नवीन बसफेरीची मागणी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांच्या मागणीची आ. नितेश राणेंनी घेतली दखल ; वैभववाडी - एडगांव वायंबोशी नवीन बसफेरीची मागणी.

प्रकाशन: 31 Dec 2023 05:44 AM
वाचन संख्या 97

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एडगांव वायंबोशी या गावात एसटी फेरी चालू नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या गावांतील विद्यार्थ्यांना देखील एसटी अभावे पायपीट करावी लागत आहे याबाबत धनगर समाजाचे युवा नेते तथा भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी एस टी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली. या मागणीच्या अनुषंगाने कोरोनाच्या आधी एकदा वैभववाडी – एडगांव वायंबोशी अशी ट्रायल एस टी बस प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचली होती. कोरोना व त्यानंतर एसटी महामंडळाचा संप त्यामुळे या कामाला अडथळे निर्माण झाले. परंतु कोरोना आणि एसटीचा संप संपून बराच अवधी उलटला तरी महामंडळ प्रशासन यावर कोणतीच पावले उचलत नसल्याचे निदर्शनास येताच पुन्हा एकदा ही एसटी बस सेवा चालू करण्याकरिता नवलराज काळे यांनी हालचाल चालू केली. त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्याकडे नवलराज काळे यांनी लेखी स्वरुपात मागणी करून सदर एसटी चालू करण्याकरिता आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा अशी मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार नितेश राणे यांनी विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सिंधुदुर्ग विभागीय कार्यालय कणकवली यांना पत्र दिले आहे सदर पत्रात असे नमूद केले आहे की, मतदारसंघातील वैभववाडी – एडगांव वायंबोशी येथे एसटी फेरी नसल्यामुळे ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे त्यामुळे शाळे विद्यार्थी व प्रवासी यांचे खूप येण्या-जाण्याचे हाल होत आहेत याबाबत श्री नवलराज काळे भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांनी निवेदन दिले आहे ते निवेदन सोबत जोडत असून निवेदनात केलेल्या मागणी ची त्वरित अंमलबजावणी करावी असे नमूद केले आहे.

आमदार नितेश राणे यांच्या या पत्रामुळे नवलराज काळे यांच्या पाठपुराव्याला आणखी ताकद मिळाली असून येणाऱ्या काळात महामंडळ काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. ही शिफारस पत्र मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीने आमदार नितेश राणे यांचे नवलराज काळे यांनी आभार मानले असून निश्चितपणाने एसटी बस सेवा चालू करण्याच्या पाठपुराव्याला यश येईल आणि ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स