म. न. वि. से. जिल्हाध्यक्ष पदी केतन सावंत ; अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
बांदा | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्ष पदी केतन सावंत यांची नियुक्ती झाली आहे. म. न. वि. से. अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते केतन सावंत यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले आहे. यापूर्वी आशीष सुभेदार यांच्या कडे म. न. वि. से. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.
ही नियुक्ती झाल्यानंतर केतन सावंत यांनी अध्यक्ष अमित ठाकरे व इतर म. न. वि. से. कार्यकर्ते यांचे आभार मानले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेतून आपण चांगले कार्य करायचा नेहमी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. म. न. वि. से. अध्यक्ष अमित ठाकरे हे लवकरच जिल्हा दौरा करणार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष केतन सावंत यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)