कुपेरी घाटी उताराला ट्रक पलटून दुर्घटना..!
ब्यूरो न्यूज | मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मालवण – कसाल मार्गावर काल शुक्रवारी रात्री कुपेरी घाटीतचिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी होत अपघात झाला. हा अपघात भयंकर होऊनही या अपघातात चालक व क्लीनर हे सुदैवाने आश्चर्यकारकरित्या बचावले. मात्र या अपघातात ट्रकचे भयानक नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त ट्रक (के. ए. -३१-७१६५) हा नियमीत चौके ते बेळगाव अशी चिरे वाहतुकीचा ट्रक आहे. शुक्रवारी रात्री चिरे भरून चौकेतून निघालेला हा ट्रक कुपेरी घाटीत उतरत असताना अचानक नादुरुस्त झाल्याने तो रस्त्यावर पलटला असे सूत्रांकडून समजते.
फोटो सौजन्य | मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)