ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीच्या 'फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग' येथे क्रीडा महोत्सव संपन्न.

कणकवलीच्या 'फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिंग' येथे क्रीडा महोत्सव संपन्न.

प्रकाशन: 24 Dec 2023 10:18 PM
वाचन संख्या 112

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘फ्लोरेट कॉलेज इंटेरियर फॅशन डिझायनिं,’ कणकवली यांच्या इनडोअर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर पुरळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी किशोर कदम, मानसी चव्हाण, अक्षय येडवे, पराग आरोलकर, साक्षी खोपर्डेकर, ऋतुजा नेरुळकर, उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पुरळकर म्हणाले की व्यक्तिमत्त्व घडण्यात खेळाचा मोठा वाटा असतो. संयम, सहनशीलता, जिद्द जिगर, चिकाटी, लढाऊपणा असे अनेक गुण विद्यार्थ्यांमध्ये खेळामुळे विकसित होतात. जिंकण्याची प्रेरणा पराभव पचवण्याची क्षमता,पराभवातून सावरून विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा निर्माण होते. शारीरिक भावनिक मानसिक विकासाचा खेळ हा पाया आहे. क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना शैक्षणिक उल्लेखनीय कामगिरी ची प्रशंसा केली. कॉलेज आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला.

फ्लोरेट कॉलेजने दिलेल्या संधीचा युवकानी लाभ घ्यावा व प्रत्येक खेळ खेळाडू वृत्तीने खेळावा असे आवाहन किशोर कदम यांनी केले. या सर्व क्रीडा प्रकारात सर्व विद्यार्थि, प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते. बुद्धिबळ स्पर्धेत विपुल राड्ये, आदित्य सावंत , हर्ष घाडीगांवकर, केतकी काकातकर, संदीप सुतार , विघ्नेश माळकर.
कॅरम स्पर्धक सानिका राऊळ, श्रावणी परब, संतोषी डग्रे, वासंती मराठे, चैताली वडर, आदिती पंडित, तृप्ती भोगले, केतकी काकतकर, किरण मेस्त्री, सुवर्णा करमळकर, चिन्मयी सावंत, मिताली शिंदे, आदित्य सावंत , नितीन मेस्त्री, संदीप सुतार , विघ्नेश माळकर, इत्यादी विद्यार्थी कॅरम बुद्धिबळ खेळांमध्ये सहभागी झाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स