ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नवलराज काळे यांचा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने सन्मान.

नवलराज काळे यांचा राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्काराने सन्मान.

प्रकाशन: 24 Dec 2023 10:51 PM
वाचन संख्या 155

माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते इचलकरंजीतील शाहू महोत्सव २०२३ कार्यक्रमात पुरस्काराचे करण्यात आले वितरण

मसुरे | प्रतिनिधी : इचलकरंजी येथे संपन्न होत असलेल्या शाहू महोत्सव २०२३ च्या भव्य कार्यक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र नवलराज विजयसिंह काळे यांना माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव पुरस्कार २०२३ हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवलराज काळे हे गेले अनेक वर्ष समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी परिवर्तनवादी चळवळीत घट्टपणे पाय रोऊन कार्यरत आहेत.काळे यांनी लोकशाही समाजवाद वैज्ञानिक दृष्टिकोन धर्मनिरिक्षता आणि राष्ट्रवाद या शाश्वत मूल्यांची पेरणी जनमानसात करण्यासाठी सामाजिक उपक्रमातून सातत्याने यशस्वीरित्या कार्य केले आहेत. व करत आहेत जे प्राप्त परिस्थितीच्या योग्य आकलन करून तात्कालीन समस्यांना भिडतात व आपल्या परीने परिवर्तनाच्या प्रक्रियेला गतिमान करतात. त्याचप्रमाणे नवलराज काळे यांचे कार्य विचारांच्या लढाईला पुढे नेणारे आहे. सामाजिक क्षेत्रात अधिक प्रमाणात तरुण-तरुणी प्रत्यक्षात येण्यासाठी नवलराज काळे हे तनमन धना ने आपल्या सहकाऱ्यांसह कृतिशील राहिले आहेत. त्यांच्या या कार्याला सलाम करण्यासाठी लोकराजा शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी कोल्हापूर यांच्या वतीने शाहू महोत्सव २०२३ कार्यक्रमात राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती समाज गौरव हा पुरस्कार प्रदान करून त्यांचा यथोजीत गौरव करण्यात आला. यावेळी नवलराज काळे असे म्हणाले की, ज्या राजाने अस्पृश्यता मिटवली, ज्या राजाने आपल्या राज्यातील जनतेच्या पाण्याचे व्यवस्थित नियोजन केले , ज्या राजाने भारतरत्न घडवले, ज्या राजाने आरक्षणाची पहिली सुरुवात केली, ज्या राजाने बहुजनांना तारले, ज्या राजाने हयात भर लोकांसाठी लोकांमध्ये राहून काम केलं अशा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या नावाचा समाज गौरव पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी भाग्याचा दिवस आहे. शाहू महाराजांच्या सैन्य दलात आमचे नातेवाईक देखील समाविष्ट होते. त्यात माझ्या आजीचे वडिल (महाराजांचे चित्यांना शिकारीची ट्रेनिंग देण्यासाठी कार्यरत होते) आजीचे आजी असे अनेक जण शाहू महाराजांचे निकटवर्तीय होते. शाहू महाराजांनी त्यावेळी शासकीय निधीतून धनगर आणि मराठा समाजातील वधू-वरांची लग्न लावून देऊन आपल्या राज्यात सामाजिक समानता राखण्याचा प्रयत्न त्यावेळी केला. लोकांमध्ये राहून लोकांची कामे करणारा लोक राजा म्हणून त्यांची ओळख आज या पृथ्वीतला वरती आहे. अशा महान थोर विचारवंताच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी निश्चितपणाने प्रेरणादायी आहे निश्चितपणाने राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला प्रेरित होऊन समाजात करत असलेले कार्य या गौरवाने अधिकाधिक उंचावत जाईल आणि माझ्या शाहू राजाने केलेल्या कार्याची झलक पुन्हा एकदा या पृथ्वीतला वरती माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा घडवून आणण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा देईल यात तीळ मात्र शंका नाही असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पुरस्कार स्वीकारत असताना नवलराज काळे यांच्यासोबत त्यांचे वडील विजयसिंह काळे, पत्नी सौ. विशाखा नवलराज काळे, व्यासपीठावरील मान्यवर सुनील जावळे, अरुण कांबळे अक्षरा कांबळे बाबू अपराज प्रथमेश कांबळे प्रज्ञा कांबळे मंथन गोठावळे, संदीप भातमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स