शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा २२ डिसेंबरला वार्षिक स्नेहसंमलन व पारितोषिक वितरण सोहळा.
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
देवगड तालुक्यातल्या शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगांव या प्रशालेचा सन २०२३-२४ चा वार्षिक स्नेहसंमलन व पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी २२ डिसेंबरला सकाळी १० वाजता संस्थेचे अध्यक्ष अरूण कर्ले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी शाळा समिती चेअरमन राजन चव्हाण, संस्थेचे पदाधिकारी व विविध समितीचे पदाधिकारी व सदस्य, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उच्चस्तर गटविकास अधिकारी वर्ग १ विजय चव्हाण हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी दु. ३ वाजता विद्यार्थ्यांचे विविध कला गुणदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याद्यापक शमशुद्दिन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, मुख्यमंत्री माही साटम, सांस्कृतिक मंत्री दिक्षिका घाडी, शालेय स्वराज्य मंडळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)