ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा क्रिडा संकुल येथे जोशपूर्ण वातावरणात खेलो इंडिया कबड्डी निवड चाचणी संपन्न.

जिल्हा क्रिडा संकुल येथे जोशपूर्ण वातावरणात खेलो इंडिया कबड्डी निवड चाचणी संपन्न.

प्रकाशन: 13 Oct 2021 09:34 PM
वाचन संख्या 146

जिल्ह्यातील बारा वर्षांखालील तीस मुले,तीस मुलींना होणार प्रशिक्षणाचा फायदा..

जिल्ह्यातील दोन पुरुष व दोन महिला राष्ट्रीय खेळाडूंना मिळणार प्रशिक्षकपदाची संधी..!

मालवण | वैभव माणगांवकर : खेलो इंडिया उपक्रम सध्या देशभरात शालेय स्तरावरुनच क्रिडा संस्कृतीची जोपासना करायची विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देत असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बालकांनाही तशीच प्रेरणा मिळण्याची सुरवात झाली आहे.
सोमवारी ,११ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे “क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे “आयोजित “जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग “आयोजित बारा वर्षांखालील मुले,मुली कबड्डी निवड चाचणी उत्साहात संपन्न झाली.निवडचाचणी मध्ये जिल्हाभरातुन आठ ते बारा वयोगटाच्या दीडशे मुला,मुलींनी सहभाग घेतला..
उपस्थित मुला मुलींच्या मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. या मध्ये आठशे मिटर धावणे,शटल रन,तिस मिटर फ्लाईंग स्टार्ट,मेडीसीन बाॅल थ्रो,लवचिकता,स्टॅण्डींग ब्राॅड जम्प , या चाचण्यांचा समावेश होता.
निवड होणार्या तीस मुली व तीस मुलांना तज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने कबड्डी कौशल्ये चार वर्षे शिकवून सराव घेतला जाईल‌.
चार वर्षांनंतर हे संघ खेलो इंडिया स्पर्धेत सोळा वर्षा खालील वयोगटात सहभागी होतिल.
महाराष्ट्र बंद असतानाही बहुसंख्येने खेळाडू सहभागी झाले होते हे विशेष…!
या निवड प्रक्रियेत अजुन पारदर्शकता  निवडचाचणीमध्ये सावंतवाडी,वेंगुर्ला,मालवण,देवगड या तालुक्यांमध्ये  निवडचाचणी घेऊन सर्वोत्तम मुला,मुलींना निवडलं जाईल .या चारही तालुक्यांमध्ये सराव शिबिरे पुढील चार वर्षे चालणार आहेत.
या चाचणी विषयीची सविस्तर माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, सुप्रसिद्ध खेळाडू, तज्ञ पंच,सामनाधिकारी व शालेय शिक्षक अजय शिंदे यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत,गरिब खेळाडू घरच्या  बिकट आर्थिक परिस्थिती मुळे क्रीडा प्रशिक्षण, स्पर्धा सहभाग घेण्यापासून वंचित रहात होते.राज्य शासन तज्ञ प्रशिक्षक, आर्थिक मदत , उत्कृष्ट मैदाने, अल्पोपहार या घटकांचा पुरवठा करणार असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू आपल्या जिल्ह्यासाठी मेडल घेउन येतिल असा विश्वास व समाधान क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री.अजय शिंदे यांनी व्यक्त केले.
या निवडचाचणी प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, क्रीडा अधिकारी नानकराम बस्सी,अजय शिंदे,नंदकीशोर नाईक,विजय मयेकर,संजय परब, नितिन हडकर,सुदीन पेडणेकर,डी.डी.सावंत,शिवदास मसगे,निलेश फोंडेकर,देठे सर,प्रशिक्षक आबा जाधव,बंटी चव्हाण, प्रशिक्षिका ॳॅलेक्सा आल्मेडा, सिद्धांत रायकर,स्वप्निल,मंगेश,यश, इतर शिक्षक व पालक उपस्थित होते.‌

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स