चिंदर येथे महिला सभा संपन्न
तालुका कृषी अधिक संजय गोसावी यांनी केले मार्गदर्शन
चिंदर | विवेक परब : आज चिंदर ग्रामपंचायत छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खास महिला सभेचे आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका-मदतनीस, आशा स्वयंसेविका तसेच अन्य महिला यात सहभागी होत्या.
या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी संजय गोसावी उपस्थित होते त्यांनी महिला बचत गटाच्या योजना व त्या कशा राबवाव्यात याबाबत महिलांना मार्गदर्शन केले. तसेच गावात १००% शोषखड्डे मारण्याचे आव्हान केले.
यावेळी सरपंच सौ.राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, शशिकांत नाटेकर, सानिका चिंदरकर, जानवी घाडी, निलेश रेवडेकर, ग्रामपंचायत कर्मचारी रणजित दत्तदास, विश्राम माळगांवकर, आबा पवार, दिगंबर जाधव इ. उपस्थिती होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)