ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली शाळा क्र. ३ यांची प्रतिकृती उच्च प्राथमिक गटात अव्वल..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात कणकवली शाळा क्र. ३ यांची प्रतिकृती उच्च प्राथमिक गटात अव्वल..!

प्रकाशन: 17 Dec 2023 07:04 PM
वाचन संख्या 184

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
कणकवलीतल्या सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय जिल्हा परिषद शाळा कणकवली क्रमांक ३ च्या कु. संतोषी सुशांत आळवे हिने विद्यार्थी प्रतिकृती मध्ये उच्च प्राथमिक गटात कणकवली तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. नुकतेच वामनराव महाडिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेरे येथे ५१ वे कणकवली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले या विज्ञान प्रदर्शनात संतोषी आळवे ने सुरक्षित वाहतूक ही प्रतिकृती मांडली होती पावसाळ्यात कोकणात पडणाऱ्या धो धो पावसामुळे नदीला येणारे पूर व त्यामुळे दोन गावांना जोडणाऱ्या छोट्या पुलावर जे पाणी भरते त्यावेळी पुलावरून वाहतूक केल्यास जीवित वित्तहानी होऊ शकते हे माहीत असूनही काही लोक अशी धोकादायक वाहतूक करतात त्याला प्रतिबंध व्हावा यासाठी करण्यात आलेली उपाययोजना या प्रतिकृती त दर्शवली होती संतोषीला कणकवली क्रमांक तीनच्या विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रतिभा कोतवाल यांनी मार्गदर्शन केले होते तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये कुमारी गाथा अमोल कांबळे हिने उच्च प्राथमिक गटात द्वितीय क्रमांक प्राप्त केला विद्यार्थिनींनी संपादित केलेल्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा करंबेळकर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

शाळेने मिळवलेल्या या उज्वल यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश चव्हाण उपाध्यक्ष सौ सायली राणे तसेच सर्व सदस्यांनी विशेष अभिनंदन केले आहे सर्व पालक वर्गातूनही या विद्यार्थिनींची प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स