ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघाच्या कर्णधारपदी निवड ; रोहित शर्माचे चाहते नाराज..!

हार्दिक पांड्याची मुंबई इंडिअन्स संघाच्या कर्णधारपदी निवड ; रोहित शर्माचे चाहते नाराज..!

प्रकाशन: 15 Dec 2023 09:19 PM
वाचन संख्या 192

रोहित शर्माला दीर्घकाळ आय पि एल खेळायची इच्छा नसल्याने हा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती.

मुंबई | क्रीडा वृत्त : आय पि एल मधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडिअन्स संघात हार्दिक पांड्याची काही दिवसांपूर्वी घरवापसी झाली आणि आता त्याच्याकडे मुंबई इंडिअन्स संघ व्यवस्थापनाने कर्णधारपदाची सुद्धा जबाबदारी सोपवली आहे.

हार्दिक पांड्याला १५ कोटी रुपयांमध्ये मुंबईने गुजरात संघाकडून ट्रेड केले होते. त्यानंतर हार्दिक पांड्या कर्णधार होणार अशी चर्चा होती. पण आता मुंबईने यावर अधिकृत माहिती दिली आहे. २०१३ पासून रोहित शर्माने मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावले होते.

मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. मुंबईने दिलेल्या संधीचे हार्दिक पांड्याने सोने केले होते. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने शानदार कामगिरी केली. आयपीएलमधील शानदार कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याला टीम इंडियातही संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातानी घेतली. मागील काही महिन्यापासून हार्दिक पांड्या टीम इंडियाचा महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे भारतीय टी २० संघाची धुराही दिली जातेय.

रोहित शर्मा मागील आयपीएलपासून एकही टी २० सामना खेळला नाही. गतवर्षी रोहित शर्माच्या नेतृ्त्वात मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच मुंबईने भविष्याचा विचार करत हार्दिक पांड्याकडे संघाची धुरा दिल्याचे बोलले जाते. मुंबईच्या या निर्णायावर रोहित शर्माच्या अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर काही जणांनी कौतुक केलेय. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याने आयपीएलमध्ये दीर्घकाळ न खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे मुंबईने हा निर्णय घेतलाय असे सूत्रांकडून समजते आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स