ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाचे ५६१ रुग्ण सक्रीय ; प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याच्या कोरोनाचे ५६१ रुग्ण सक्रीय ; प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती.

प्रकाशन: 13 Oct 2021 07:50 PM
वाचन संख्या 53

आत्तापर्यंत जिल्ह्यातील ५० हजार ६०५ रुग्णांनी केलीय कोरोनावर मात..!

ओरोस | प्रतिनिधी : जिल्ह्यात बुधवारी ८३ रुग्ण काेराेनामुक्त झाले असून नवीन २५ व्यक्तींचा काेराेना तपासणी अहवाल पाॅजिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींचा आकडा १ हजार ४३८ वर पाेहाेचला असून बुधवारी २ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांनी दिली. 

      जिल्ह्यात बुधवारी जिल्ह्यात नवीन २५ रुग्ण आढळले आहेत . तर ८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे . त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजार ६०५ एवढी झाली आहे .  दरम्यान  बुधवारी मृत्यू झालेल्यांमध्ये मालवण तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष , कुडाळ तालुक्यातील ६९ वर्षीय पुरुष  रुग्णांचा समावेश आहे .

 जिल्ह्यात सध्या ५६१ रुग्ण सक्रिय आहेत.  आजपर्यंत एकुण ५२ हजार ६०६ पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत . त्यापैकी ५० हजार ६०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात ४२ रुग्ण ऑक्सीजन वर तर ११ रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत.  जिल्ह्यात २ लाख ९६ हजार ५० आरटीपीसीआर टेस्टचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३७ हजार ६०९ नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. आज ५५२ आरटीपीसीआर टेस्टचे नमुने तपासण्यात आले. अॅन्टिजन टेस्टचे २ लाख ७९ हजार ७४४ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १५ हजार ४७७ नमुने पॉजिटिव्ह आले आहेत. तर आज १५७ अॅन्टिजन टेस्ट नमुने तपासण्यात आले. 

आजचे कोरोना पॉजिटिव्ह तालुकानिहाय रुग्ण –

         जिल्ह्यात आज २५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. यामध्ये देवगड ४ ,  कणकवली ७ , कुडाळ ७ , मालवण ४ , सावंतवाडी १,  वेंगुर्ला २ रुग्णांचा समावेश आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स