ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वायरीत संतश्री संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न ; तेली समाज बांधवांनी वाहिली मनःपूर्वक श्रध्दा वंदना.

वायरीत संतश्री संताजी जगनाडे महाराज जयंती संपन्न ; तेली समाज बांधवांनी वाहिली मनःपूर्वक श्रध्दा वंदना.

प्रकाशन: 09 Dec 2023 12:07 AM
वाचन संख्या 291

तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील वायरी भूतनाथ येथे काल शुक्रवारी ८ डिसेंबरला संतश्री संताजी जगनाडे महाराजांची ३९९ वी जयंती मोठ्या उत्साहात वायरी भूतनाथ येथील तेली समाज बांधवांनी नुकतीच साजरी केली.

यावेळी संत श्रेष्ठ आणि संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचे लेखनिक, त्यांच्या गाथा पुनर्जीवित करणारे थोर संत, समस्त तेली समाजाचे मानबिंदू म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेले श्री संताजी महाराज जगनाडे (सदुंबरे) यांची जयंती वायरी येथील श्री आनंद बांबार्डेकर यांच्या घरी साजरी केली गेली. तेली समाजातील ज्येष्ठ नागरिक रमाकांत पाटकर आणि वायरी उपसरपंच सौ प्राची माणगांवकर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन केले गेले. श्री संताजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रास्ताविक श्री. दादा वेंगुर्लेकर आणि त्यांच्या जीवनावरील समग्र माहिती श्री. महादेव उर्फ भाऊ तळवडेकर यांनी सांगितली. शेवटी श्री. आनंद बांबार्डेकर यांनी आभार मानले.

या जयंतीला तेली बांधव मोठ्या संख्येने श्रद्धा वंदना वाहयला उपस्थित होते. श्री आनंद बांबार्डेकर, ज्येष्ठ नागरिक मा. रमाकांत पाटकर, दादा वेंगुर्लेकर, महादेव उर्फ भाऊ तळवडेकर, पराग माणगांवकर, गुरुदास तळवडेकर, प्रसाद डिचवलकर, तात्या तळवडेकर, सर्वेश पाटकर, प्रतीक डिचवलकर, बंड्या माणगांवकर, वल्लभ पाटकर, उदय पाटकर, अभय पाटकर तसेच महिलांमध्ये मीना मनोहर पाटकर, अर्चना तळवडेकर, प्रिया पाटकर, सुहासिनी पाटकर, सरिता पाटकर, आरती बांबार्डेकर, शारदा पाटकर, उर्मिला माणगांवकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, मोक्ष पेडणेकर, अमृता बांबार्डेकर, माही बांबार्डेकर व स्थानिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 331

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स