ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बख़तियार ख़ान मोठ्या हॅटट्रीकच्या मार्गावर ; एल आय सी साठी उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा.

बख़तियार ख़ान मोठ्या हॅटट्रीकच्या मार्गावर ; एल आय सी साठी उल्लेखनीय व प्रशंसनीय सेवा.

प्रकाशन: 09 Dec 2023 12:37 AM
वाचन संख्या 560

मालवण | नझिरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे
बख़तियार खान यांनी एल आय सी मध्ये सलग दुसर्या ‘एम डी आर टी’ चा बहुमान मिळवला आहे. याबद्दल वर्षी त्यांचा अधिकारी सतेजा बोवलेकर मॅडम व ज्येष्ठ अधिकारी शैलेश पावसकर यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे. यावर्षीच्या पॉलिसीचा शतक ऑक्टोबर महिन्यात पूर्ण करून बख़त्यार खान हे मालवण शाखेत अव्वल आहेत.

एलआयसी मालवण शाखेतील सलग दोन वर्ष २०२३ व २०२४ ह्या वर्षातील पहिले एम डी आर टी होण्याचे बहुमान प्राप्त झाले आहे.या निमित्त मालवण शाखे तर्फे शाखा प्रबंधक सतेजां बोवलेकर मॅडम व विकास अधिकारी शैलेश पावसकर ह्यांच्या हस्ते त्यांना चषक देऊन सत्कार करण्यात आला. गेली २१ वर्ष ग्राहकांना योग्य विमा सल्ला व सेवा देणे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बख़त्यार खान ओळखले जातात. या बद्दल प्रतिक्रिया देताना बख़तियार खान यांनी त्यांच्या ग्राहकांचा व त्यांचे सहकारी मित्र संजय बिरमोळे व परिवाराचे तसेच मालवणातील त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानले आहेत.

बख़तियार खान यांनी पुढील वर्षी हा पुरस्कार मिळवून हॅटट्रीक साध्य करावी अशी सदिच्छा त्यांच्या मित्रमंडळाने व्यक्त केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स