ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हे तर नौदलाचे गिफ्ट..यात भाजपचा काय संबंध ; मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी आरोपांची सरबत्ती करत विचारले आहेत सवाल.

हे तर नौदलाचे गिफ्ट..यात भाजपचा काय संबंध ; मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी आरोपांची सरबत्ती करत विचारले आहेत सवाल.

प्रकाशन: 04 Dec 2023 05:46 PM
वाचन संख्या 174

मालवण | प्रतिनिधी : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौरा व संपूर्ण प्रशासनीक व संरक्षण दलांना धन्यवाद देऊन मनसेचे अमित इब्रामपूरकर यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांवर आरोपांची सरबत्ती केली आहे. नौसेना दिन मालवणात साजरा झालाआहे याचा सर्व मालवणवासीयांना अभिमान आहे.त्याचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नाही.दौऱ्यावेळी येणारे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भारतीय नौदलात राष्ट्रपतींनंतर दुसर्‍या क्रमांकाचे महत्व आहे.मा.नरेंद्र मोदी हे भाजपचे असले तरी प्रथम ते देशाचे पंतप्रधान आहेतच.पण त्यांच्याकडे नौदलाचे संवैधनिक पद आहे म्हणुन मोदी मालवणात येत आहेत.नौदल दिन देशाच्या नागरिकांचा आहे.असे अतिमहनिय व्यक्तींसाठी राखून ठेवलेला फंड देशाच्या नागरिकांचा आहे.या पैशांवर अधिकारी आणि ठेकेदार हात धुवून घेत आहेत.याला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा आशीर्वाद आहे.मनसे पालकमंत्र्यांची तक्रार पीएओ कार्यालयाकडे करणार आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आहे या खात्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हॅलिकॉप्टर उतरवण्यासाठी हॅलिपॅड बनवण्यासाठी ई निविदा जाहीर करण्यात आली आहे. अगोदरच ठरलेल्या ठेकेदारांकडून काम पूर्ण झाल्यानंतर आपत्कालीन नावावर बेकायदेशीर ई निविदा प्रक्रिया राबवणे हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा हॅलिपॅड ही निविदा प्रक्रियेतील गोलमाल २ असल्याची घणाघाती टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. नौसेना दिनाचा कार्यक्रम सहा महिने अगोदर ठरलेला असताना कार्यक्रमाच्या आधी एक दिवस निविदा प्रक्रियेची जाहिरात कोणासाठी पालकमंत्र्यांचे बांधकाम खाते काढत आहे ?

यापूर्वी आंगणेवाडी जत्रेपूर्वी आजुबाजुच्या रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याच रस्त्यांची ई निविदा प्रक्रिया काढणे हा गोलमाल १ होता.आता हॅलीपॅड ई-निविदा प्रक्रियात ‘गोलमाल २ असुन पालकमंत्र्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार गोलमाल है भाई सब गोलमाल है असे आहे काय ?

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हॅलिपॅड बनवण्यासाठी ई निविदा वृत्तपत्रांमध्ये जाहीर करण्यात आली आहे.यामध्ये प्रामुख्याने मालवण येथे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरते हॅलिपॅड तयार करण्यासाठी ५५ लाख ७४ हजार ४९९ रुपये मंजूर केले आहेत. बोर्डिंग मैदान मालवण जवळ हॅलिपॅड तयार करण्यासाठी ७८ लाख ८७ हजार १३२ रुपये मंजूर केले आहेत. तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय मालवण येथे हेलीपॅड सुविधेसाठी ९३ लाख ६७ हजार ५९२ रुपये निधी मंजूर झाला आहे सीलबंद लखोटा मध्ये निविदा सादर केल्यानंतर कार्यक्रमाच्या आधी एक दिवस मान्यताप्राप्त ठेकेदारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे वास्तविकपणे या सर्व हॅलीपॅडचे काम पूर्ण झालेले असुन त्याचे चित्रीकरणही मालवण जनतेकडे आहे.

राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवाजी महाराजांचा पूर्ण कृती पुतळा हा नौदलाचे गिफ्ट असून त्याचा भाजपशी काही संबंध नाही.हा पुतळा आम्हीच उभा केला अशी बोंब भाजपचे लोक करत आहेत. नौदलाचे गिफ्ट असल्यामुळे त्याच्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या भूसंपादन प्रक्रिया राज्यशासनाकडून म्हणजेच पालकमंत्र्यांकडून पूर्ण करून घेणे ही प्रशासकीय बाब आहे हा पुतळा दोन महिन्यात उभा राहिला याचे सर्व श्रेय भारतीय नौदलाला जाते.नौदलामुळे सीआरझेडचा ना हरकत दाखला विनाविलंब मिळाला.नौदल म्हणजेच आर्मीच्या कामाचे श्रेय जर पालकमंत्री घेत असतील आणि हिम्मत असेल तर गेले आठ वर्षे मालवण तहसील कार्यालय,पंचायत समिती व अन्य सामान्य जनतेच्या इमारतीचा बांधकाम प्रस्ताव साठी लागणारा सीआरझेड नाहकरत दाखला दोन महिन्यात आणून दाखवावा.फुकट श्रेय घेवू नये असे अमित इब्रामपूरकर यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स