ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर येथे हरिनाम सप्ताह आणि कार्तिकी जत्रोत्सवाचे आयोजन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बिळवस येथील श्री सातेरी देवी जलमंदिर येथे हरिनाम सप्ताह आणि कार्तिकी जत्रोत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 19 Nov 2023 01:10 AM
वाचन संख्या 193

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवची मूळमाया बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरामध्ये २३ नोव्हेंबरला सकाळी १०.०० वा. पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर दिवशी भाविक-भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यांसह उपस्थित राहून हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे निमंत्रण देण्यात आले आहे.

२५ नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार असून देवीची विधीवत पुजा-अर्चा, रात्री पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर १२.०० वा. चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा महान पौराणीक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तसेच नाट्य रसिक यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स