माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून आयोजीत आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील ‘हाॅटेल आराध्य’ येथे शनिवारी १८ नोव्हेंबरला माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्या माध्यमातून आयोजीत आधारकार्ड शिबीर संपन्न झाले.
यामध्ये आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती, मोबाईल क्रमांक लिंक करणे व आधार कार्ड विषयक इतर प्रक्रियांचा समावेश होता. ५० जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराच्या आयोजनाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करुन माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांचे आभार मानले जात आहेत.
या शिबिराला सहकार्य केलेल्या तंत्रज्ञांना माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनीही विशेष धन्यवाद दिले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)