ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वडाचापाट येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप!

वडाचापाट येथे उज्वला गॅस लाभार्थ्यांना शेगडी- सिलेंडर वाटप!

प्रकाशन: 12 Nov 2023 01:25 PM
वाचन संख्या 189

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या वडाचापाट ग्रामपंचायत येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त झालेल्या गॅस सिलेंडर आणि शेगडीचे वितरण माजी सभापती राजेंद्र प्रभूदेसाई आणि सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभूदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गॅस कनेक्शन अभावी महिला चुलीवर जेवण बनवतात. त्यामुळे जंगल तोड केली जाते. तसेच चुलीवर जेवण बनवल्यामुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे महिलांच्या आरोग्यावर त्या चुलीच्या धुराचा त्रास होतो व ते दम्या सारख्या आजारांना बळी पडतात. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात उज्वला गॅस योजना सुरु केली आहे. वडाचापाट गावातील या योजने अंतर्गत कनेक्शन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मालवण येथे जाऊन शेगडी व सिलेंडर आणणे खर्चिक ठरणार होते. त्यामुळे या लाभार्थ्यांना वडाचापाट येथे सर्व साहित्य मिळेल अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी यावेळी दिली. सर्वसामान्यासाठी धावून येणाऱ्या वडाचापाट येथील देसाई कुटुंबियांचे लाभार्थ्यांनी यावेळी आभार मानले.

यावेळी उपसरपंच सचिन पाताडे, उद्योजक दयानंद देसाई, सदस्य विनायक प्रभुदेसाई, खरेदी विक्री संघाचे श्री मयेकर, रामचंद्र माळकर, दीपक पाताडे तसेच लाभार्थी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स