ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरे परिसरात उत्साहाने संपन्न झाले नरकासूर दहन ; दिवाळी २०२३

मसुरे परिसरात उत्साहाने संपन्न झाले नरकासूर दहन ; दिवाळी २०२३

प्रकाशन: 13 Nov 2023 07:16 AM
वाचन संख्या 235

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे येथे दिवाळीपूर्व नरकासुर दहन ही एक मोठी परंपरा आहे. मसुरे परिसरात नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले गेले. श्रीकृष्णाने नरकचतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. कागदाचे लगदे, पालापाचोळा आणि विविध साहित्य नरकासुर बनविण्यासाठी वापरले जाते. युवा पिढी दसऱ्यानंतर अक्षरशः जोशात नरकासुर तयार करण्यासाठी झटत असतात. मुख्यत: रात्रीच्या वेळी नरकासुर बनविण्याची प्रक्रिया सुरू असते. यंदा दिवाळी २०२३ पूर्वी पाऊस पडल्याने काही प्रमाणात तयारी वर विरजण पडले होते. शनिवारी रात्री मसुरे बाजारपेठ, मर्डे वाडी, गडघेरावाडी, देऊळवाडा, बांदिवडे आदी भागात युवकांनी नरकासुर धिंड काढत पहाटे दहन केले.

यावेळी शिरीष प्रभुगांवकर, बाळू दळवी, दत्तप्रसाद चव्हाण, दीपक पेडणेकर, अवधूत चव्हाण, रुपेश दुखंडे, रामा मसूरकर, संदेश सागवेकर, सुनील दुखंडे, चेतन दुखंडे, रोशन दुखंडे समर्थ दुखंडे, आयुष दुखंडे, लावण्या दुखंडे, विक्रांत प्रभुगांवकर, रणवीर प्रभुगावकर, प्रथमेश घाडी, अनिकेत चव्हाण, बंडू शिंदे, मिहीर मसुरकर, अरुंधती चव्हाण, गोरक्ष चव्हाण, निधी पेडणेकर, झुंजार पेडणेकर, शैलेश मसुरकर, अनिकेत चव्हाण, स्वप्निल दुखंडे आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स