ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
'सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गांवातली' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कंदिल स्पर्धेचे आयोजन.

'सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गांवातली' यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कंदिल स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 10 Nov 2023 01:56 AM
वाचन संख्या 196

आचरा | प्रसाद टोपले /अनिकेत पांगे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथे भव्य कंदिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सिराॅक गृप आचरा व रंगभूमी गांवातली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजीत केली गेली असून आपल्या गांवाला आपल्या कौशल्याने तेजोमय करण्याची ही अनोखी संकल्पना आहे. आपल्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता,आपली दीपावली अधिक आनंदी व प्रकाशमय करण्याकरिता आणि आपल्या गावालादेखील आनंदोत्सवाची सजावटीची पहिली आंघोळ घालण्याकरिता सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत या कंदिल स्पर्धेत जास्तीत जास्त कलाकारांनी तसेच आभार वृद्धांनी सहभागी व्हायचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे आहेत.:
१) दिनांक १४ नोव्हेंबर पर्यंत कंदिल तयार करून तो आपण आपल्या दाराबाहेरील रस्ता किंवा पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंची वरच लावावा, जेणेकरून परीक्षण करणे सोपे जाईल.

२) परीक्षक आपण दिलेल्या पत्त्यावर म्हणजेच आपल्या घरी येऊन आपल्या कंदीलाचे संध्याकाळी परीक्षण करतील.

३) कंदिलाची लांबी, रुंदी,उंची कमीत कमी दोन फूट असावी, तसेच त्यामध्ये विद्युत दिवा, (बल्ब) असणे आवश्यक. ज्यामुळे आपले घर, परिसर, वाडी, गांव प्रकाशमान होईल.

४) आपल्या कंदीलाचा युट्युब व्हिडिओ बनवला जाईल त्यामुळे आपले कौशल्य इतरांनाही कळेल. हाच व्हिडिओ बक्षीस समारंभ प्रसंगी सुद्धा दाखवला जाईल.

५) संपूर्ण कंदील बनवण्याचा किंवा बनवताना चा व्हिडिओ बनवावा, परीक्षक किंवा आयोजक यांनी तो मागल्यास द्यावाच लागेल. अन्यथा आपला कंदिल विचारात घेतला जाणार नाही.

६) स्पर्धेमध्ये कुटुंब, फ्रेंड्स सर्कल बचत गट, वाडी मंडळ, महिला मंडळ म्हणजेच पंचक्रोशीतील कोणीही भाग घेऊ शकतात.

७) स्पर्धेसाठी परीक्षण झाल्यानंतर लवकरच आपणाला बक्षीस वितरण समारंभात बोलवण्यात येईल. नोंदणी करतेवेळी आपला व्हाट्सअप नंबर देणे अनिवार्य राहील.

८) स्पर्धेसाठी बक्षिसे
प्रथम क्रमांक रुपये ४००१/-
द्वितीय क्रमांक रुपये ३००१/-
तृतीय क्रमांक रुपये २००१/-

उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रुपये ५०० /-

९) स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये १५०/- राहील.

१०) प्रवेशिका फॉर्म मिळण्याचे व भरण्याचे ठिकाण हे ‘सी कॅफे’ आचरा, हॉटेल सी रॉक शेजारी आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स