ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमांनी झाला संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जानवली बौद्ध विकास संघटने तर्फे विद्यार्थी दिन विविध उपक्रमांनी झाला संपन्न.

प्रकाशन: 08 Nov 2023 09:01 PM
वाचन संख्या 151

मसुरे | प्रतिनिधी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल येथे इ.१ लीत प्रवेश घेतला. हा दिवस ‘शाळा प्रवेश दिवस ‘ म्हणून जानवली बौद्ध विकास संघटनेने उत्साहात साजरा केला.

यावेळी कास्ट्राईब संघटनेचे महासचिव तथा ओसरगांव क्र.१ या प्रशालेचे मुख्याध्यापक,आदर्श शिक्षक श्री. किशोर कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवडक भाषणे व लेखन असलेले पुस्तक भेट स्वरुपात दिले. यावेळी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, महामानव डॉ. आंबेडकर यांचे विचार संपूर्ण विश्वाला आदर्शदायी आहेत.प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. आपले सारे जीवन दीन-दुबळ्या जनतेसाठी समर्पित केले अशा महान कर्तुत्वाला आपण सारे वंदन करुया. पुस्तक वाचून आपले व सर्वांचे जीवन समृद्ध बनवूया. आजच्या पिढीने खूप वाचन करायला हवे. बाबासाहेबांनी आपल्या जीवनात पुस्तकाला उच्च स्थान दिले. वाचन वसा जपुया व वाढवुया.असे प्रेरणावर्धक मनोगत व्यक्त केले. आयुनी. मानसी कदम , आयु.प्रियांशू कदम, आयुनी.अश्विनी कदम यांनी प्रबोधनपर विचार व्यक्त केले. आयुनी.प्रियांका कदम यांनी ‘भीम माझा लई शिकला’हे गीत सादर केले. यावेळी आयु.किशोर कदम यांनी प्रदान केलेल्या पुस्तकातील काही भाग वाचण्यात आला.

या कार्यक्रमाला दिपक कदम, (अध्यक्ष)संदेश कदम (उपाध्यक्ष) अशोक कदम,संतोष कदम, अनिल कदम, पूजा कदम,संयुक्ता तांबे, कार्तिकी कदम,सायली कदम, सलोनी कदम व बालवर्ग उपस्थित होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. संदीप कदम यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स