दिपावली निमित्त कास वाघबिळकर मित्रमंडळाच्या वतीने डबलबारीचा जंगी सामना..!
बांदा | राकेश परब : यंदाच्या दिपावली २०२३चे औचित्य साधून कास वाघबिळकर मित्रमंडळाने २०×२० डबलबारी जंगी सामन्याचे रविवारी दिनांक १२ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता कास येथे आयोजन करण्यात आले आहे.
हा सामना विनादेवी प्रासादीक मंडळ उंडील गुरुवर्य बुवा प्रकाश पारकर बुवा – श्री. व्यंकटेश नर, पख़वाज- सागर कदम, तबला भावेश लाड. विरूध्द श्री. कोटेश्वर नवतरूण भजन मंडळ हरकुल बु. ता.कणकवली, गुरूवर्य श्री.प्रमोद हरयाण, बुवा – श्री.अभिषेक शिरसाट, पखवाज- रूपेश परब, तबला – अभिषेक सुतार यांच्यामध्ये होणार आहे.
डबलबारी प्रेमी, भजन प्रेमी तसेच बांदा दशक्रोशी, मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन वाघबिळकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)