ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक हे जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतात हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अन्यायकारक निर्णय

जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक हे जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतात हा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अन्यायकारक निर्णय

प्रकाशन: 05 Nov 2023 07:56 PM
वाचन संख्या 79

या निर्णयाला कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचा जोरदार विरोध

संतोष साळसकर | सहसंपादक: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक हे जिल्ह्यात कुठेही व्यवसाय करू शकतात हे धोरण उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अन्याय कारक आहे. या निर्णयाचा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने जोरदार विरोध करुन या निर्णयाचा निषेध केला आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालक मालक यांच्यामध्ये आपापसामध्ये मोठे वाद विवाद निर्माण होऊन एकमेकांची डोकी फोडण्याचे प्रसंग उद्भवू शकतात.कारण कणकवलीचा रिक्षा चालक हा कुडाळला जाऊन व्यवसाय करू शकतो. असे मत परिवहन विभागाचे आहे. परंतु कुडाळचे रिक्षाचालक हे कणकवलीच्या रिक्षाचालकाला आपल्या स्टॅन्डला रिक्षा व्यवसाय करायला देणार नाहीत.व यातूनच डोकी फुटली जाऊ शकतात. याचा विचार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा तसेच यावरून रिक्षाचालकांमध्ये कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे हेच सर्वस्वी जबाबदार असतील असा सज्जड इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी दिला आहे. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे असे म्हणणे आहे, आत्ता नवीन धोरणानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीला मोठ्या प्रमाणात नवीन रिक्षा परवाने देण्यात येत आहेत व दिलेले आहेत ते सर्व जिल्हा परवाना आहेत. असे श्री.काळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुठचाही रिक्षाचालक कुठेही व्यवसाय करू शकतो. असे म्हणणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आहे. परंतु त्या रिक्षा चालकांना परवाना देताना त्यांचा स्थायी पत्ता ज्या तालुक्यातील गाव आहे ते रिक्षा स्टॅन्ड त्याला देण्यात यावे. तसेच क्र.उप प्रापका/सिंधु/नोंदणी/०७/जावक क्रमांक ३०८२ सिंधुदुर्ग कार्यालय दिनांक २०/११/२००७ च्या परिपत्रकानुसारच रिक्षा व्यवसाय करण्यास मुभा द्यावी. त्याचप्रमाणे जे तालुका परवाने (f) व गाव परवाने आहेत, त्यांना रोड टॅक्स, विमा, परवाना नूतनीकरण, पासिंग फी अन्य सर्व कागदपत्रांची फी ही जिल्हा परवान्या प्रमाणेच भरावी लागत आहे. मग हा दुजेभाव कशासाठी ? त्यामुळे गाव परवाने, तालुका परवाने यांना सुद्धा जिल्हा परवाना म्हणून मान्यता देण्यात यावी.

तसेच आज मीती पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक हे गुण्या गोविंदाने व्यवसाय करीत आहेत, परंतु उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जिल्ह्यातील रिक्षाचालक मालक यांच्या मध्ये रिक्षा लावण्यावरुन भांडणे होणार आहेत व त्याची सर्वस्वी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची असेल.

या निर्णयाच्या विरोधात दाद मागण्यासाठी सोमवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक मालक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे.असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स