ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर म.न.पा.चे वर्चस्व..!

विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कोल्हापूर म.न.पा.चे वर्चस्व..!

प्रकाशन: 01 Nov 2023 01:56 AM
वाचन संख्या 176

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आयोजीत झालेल्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २६ आणि २७ आक्टोबर २०२३ रोजी जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हाॅलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. विद्या कर्वे शिरस यांनी उपस्थिती दर्शवली.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सांगली म.न.पा, सातारा, कोल्हापूर, कोल्हापूर म.न.पा., इचलकरंजी मी.न.पा. या विभागातील १४, १७ आणि १९ वयोगटातील मुलामुलींचे संघांनी यात भाग घेतला होता. १४, १७वयोगटातील मुले-मुली आणि १९वयोगटातील मुलांच्या गटातील विजेतेपद पटकावून कोल्हापूर महानगर पालिकेने या स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.तर १९वयोगटातील सातारा मुलींनी पहिला क्रमांक पटकावला.

इतर निकाल खालीलप्रमाणे आहेत.
१४वर्षे मुले :क्र.२ सातारा
वैयक्तिक निवड चाचणी
१ कु.आशिष विवेक माने सातारा
२ कु.अथर्व संदीप कदम सातारा
३ कु.संकल्प दीपक बांदिवडेकर कोल्हापूर
१४ वर्षे मुली : क्र.२ सिंधुदुर्ग
क्र.३सातारा
वैयक्तिक निवड चाचणी
१ कु.अरुंधती वैभव फाळके सातारा
२ कु.अवनी प्रशांत माने कोल्हापूर
३ कु.आर्या अश्विन दिघे
१७वर्षे मुले :
क्र.२कोल्हापूर क्र.३ इचलकरंजी म.न.पा.

वैयक्तिक निवड चाचणी
१ कु. ईशान राज माने कोल्हापूर
२ कु. शिवम् राजू गुप्ता कोल्हापूर
३ कु.स्वयंभू राजेश निंबाळकर

१७वर्षे मुली : क्र.२ सातारा
क्र.३ रत्नागिरी
वैयक्तिक निवड चाचणी :
१ कु.सायली महेश माजगांवकर सातारा
२ कु.अनुष्का रमेश मतकर सातारा
३ कु.दुर्वा मनोज चिपकर सिंधुदुर्ग मालवण
१९ वर्षे मुले : क्र.२ सिंधुदुर्ग
क्र.३ सातारा
वैयक्तिक निवड चाचणी
१ कु.संस्कार निलेश भोसले सातारा
२कु. जाकी सलीम मुल्ला सिंधुदुर्ग सावंतवाडी
३ कु.मयंक शैलेशकुमार रांदेरी
१९ वर्षे मुली
क्र.२ रत्नागिरी
क्र.३ सांगली म.न.पा.
वैयक्तिक निवड चाचणी
१ कु.ईश्वरी अनिरुद्ध पोतदार सातारा
२ कु.मिहिका कौशिक मराठे इचलकरंजी
३ कु.अदिती संतोष शेंडुरे.

या स्पर्धेचे आयोजन जय गणेश स्कूल मालवण, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग यांनी मालवण टेबल टेनिस अकॅडमीच्या श्री विष्णू कोरगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. विलास परुळेकर, पंकज राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स