ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
देवबाग येथे मराठा क्षत्रीय विद्यावर्धक मंडळाने के. जी. ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि गरजू मुलांना केले दप्तरांचे वितरण.

देवबाग येथे मराठा क्षत्रीय विद्यावर्धक मंडळाने के. जी. ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वह्या आणि गरजू मुलांना केले दप्तरांचे वितरण.

प्रकाशन: 01 Nov 2023 01:46 AM
वाचन संख्या 322

तारकर्ली | सुरेश बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या देवबाग येथे मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ, मुंबई यांच्या वतीन देवबाग गांवातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि दप्तर वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला देवबागचे ज्येष्ठ नागरिक समाज बांधव श्री आबा कुर्ले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाजसेवक दाजी राऊळ, म. क्ष. वि. मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर, देवबाग ग्रामपंचायत शिपाई दादा सातोस्कर, समाजसेवक बबी कासवकर यांच्या हस्ते देवबाग मधील के. जी. ते १० शिकत असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि गरीब मुलांना दप्तर यावेळी वाटप करण्यात आले. या वह्या वाटपाच्या कार्यक्रमात ५० विद्यार्थ्यांनी वह्यांचा आणि दप्तराचा १० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला होता. यावेळी संस्थेने राबविलेल्या वर्धापन दिनानिमित्त दहावीतील गुणवंत प्राची तळवडकर हिला मंडळातर्फे प्रसिस्तपत्रक आणि पाण्याचा थर्मास श्री. कुर्ले यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी बोलताना सुरेश बापर्डेकर यांनी सांगितले की या संस्थेला १०५ वर्षे झाली आहेत. दरवर्षी संस्थेचा वाढदिवस मुंबई येथील त्यांच्या हॉल मध्ये घेण्यात येतो १०वी, १२वी, पदवीधर यांचा ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याज त्यांच्या अटी शर्ती प्रमाणे सर्वात जास्त गुण ,सर्वात जास्त विषयात गुण संपादन करणाऱ्यांना दिले जाते आणि ज्यांनी भाग घेतला असेल त्यांना संस्थेकडून प्रत्येक वर्षी वेगवेगळा शालोपयोगी भेट देऊन गौरविण्यात येते. पुढील वर्षी देवबाग तारकर्ली येथून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थ्यांचे दादा सातोस्कर यांनी आभार मानले. उपस्थित सर्व मुलांना बबी कासवकर यांच्याकडून गोड बुंदीचे लाडू खाऊ स्वरुपात वाटण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स