ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली गगनबावडा- तरेळे पदयात्रा सुरु.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली गगनबावडा- तरेळे पदयात्रा सुरु.

प्रकाशन: 30 Oct 2023 01:14 PM
वाचन संख्या 445

खास. विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक यांच्या सह इंडिया आघाडीच्या अनेकांची उपस्थिती.

वैभववाडी | प्रतिनिधी : शिवसेना ( उ.बा.ठा ) जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुदवडकर, कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, यांची प्रमुख उपस्थितीत तळेरे ते गगनबावडा रस्त्यावर आज ३० ऑक्टोबरला सकाळी पदयात्रा सुरु झाली. हा रस्ता संपूर्ण नादुरुस्त झाला असुन त्यावर मोठे मोठे खड्डे पडून रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली आहे व याकडे राज्य शासनासह, सा.बां.विभागाचा मात्र दुर्लक्ष झाला आहे असा आरोप करत शासन प्रशासन यांना जागं करण्यासाठीं ही पदयात्रा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करणार असल्याचे शिवसेनेकडून पूर्वीच जाहीर केले गेले होते. गगनबावडा ते तळेरेपर्यंत २१ कि.मी. पदयात्रेचा शुभारंभ शिवसेना नेते खास. विनायक राऊत यांच्या नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, महिला महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुका प्रमुख मंगेश लोके, तालुका काँगेस प्रमुख दादामिया पाटणकर, राजू रावराणे, हर्षद गावडे, लक्ष्मण रावराणे, वैधही गुडेकडे, संजना कोलते, माधवी दळवी, प्रमोद मसुरकर, धनश्री मेस्त्री,भालचंद्र दळवी , सचिन सावंत, गुलजार काझी, बादशहा लांजेकर,तसेच महाविकास आघाडीचे ( इंडिया ) नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा सेनेचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स