ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रिक्षा चालक - मालकांचा रत्नागिरी येथील मार्गदर्शन मेळावा संपन्न ; एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रिक्षा चालक - मालकांचा रत्नागिरी येथील मार्गदर्शन मेळावा संपन्न ; एकत्रीकरण व समृद्धीसाठी दिली गेली हाक.

प्रकाशन: 29 Oct 2023 04:56 PM
वाचन संख्या 301

रिक्षा संघटनेत काम करताना राजकीय झेंडे बाजुला ठेवून रिक्षा चालक – मालक यांनी रिक्षाचा काळा – पिवळा झेंडा हाती घ्यायचे मार्गदर्शकांचे आवाहन..!

रत्नागिरी | प्रतिनिधी : रिक्षा चालक – मालक संघटनेच्या रत्नागिरी येथे २८ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या सभेमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात रिक्षा व्यवसायिक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे नितीन पवार, तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव तथा सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक – मालक संघटनेचे सचिव सुधीर पराडकर उपस्थित होते.

यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यातील बहुतेक सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक यांनी आपले विचार मांडले व व्यवसायाला येणाऱ्या प्रमुख अडचणी मान्यवरांन समोर मांडले. त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. त्यावेळी रिक्षा चालक मालक यांना संबोधित करताना श्री. सुधीर पराडकर यांनी आज मितीपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा व राज्यस्तरीय झालेल्या कामांचा आढावा व मार्गदर्शन केले. तसेच कोरोना कालावधीत मुंबईवरून ट्रान्सफर होऊन आलेले रिक्षा परवाना रद्द झाले पाहिजेत, नवीन परवाना बंद झाले पाहिजेत. तसेच ८ वर्षावरील परवाना अट रद्द करून पंधरा वर्षे करण्यात यावी. तसेच आरटीओ ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात दलालांची संख्या वाढलेली आहे. यावर आवाज उठविणे महत्त्वाचे आहे.अशा अनेक विषयांना मार्गदर्शन केले. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनला रिक्षा स्टँड मंजूर करणे, त्याचप्रमाणे नोकरीमध्ये असलेल्या व निवृत्त झालेल्या कामगारांचे रिक्षा परवाने रद्द झालेच पाहिजे. आर. टी. ओ. संबंधित येणाऱ्या अडचणीवर कशी मात करावी याचे बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आर. टी .ए. कमिटीची मीटिंग होऊन त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून रिक्षा संबंधित निर्णय घेण्यात यावे अशी मागणी केली. तसेच रिक्षा संघटनेत काम करताना पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करावे, व रिक्षा संघटनेचा काळा पिवळा झेंडा हाती घ्यावा असे आव्हान केले. तसेच कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव (दादा) पेणकर, उपाध्यक्ष जितेंद्र पवार यांच्या सहमतीने कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून श्री प्रताप भाटकर यांची नेमणूक झाल्याचे संतोष नाईक यांनी घोषणा केली. सर्व रिक्षा चालक-मालक यांनी भाटकर यांचे अभिनंदन केले.

रिक्षा चालक-मालक कृती समितीचे पुणे सरचिटणीस नितीनजी पवार यांनी मार्गदर्शन करताना २०१४ सालच्या अहवालाप्रमाणे रिक्षा चालक-मालक कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी व्हावी असे सांगितले. त्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशना पूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना रिक्षाचालकांच्या महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात यावे, असे सुचविण्यात आले.व त्याची अंमलबजावणी व्हावी. त्याचप्रमाणे रिक्षा परवाने ताबडतोब बंद करण्यात यावेत व सी एन जी कमी दाबाने मिळत असल्यास वजन माप विभागाकडे निवेदन देऊन गॅस मापाची यंत्रणा उपलब्ध करून द्यावी असा आग्रह धरणे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात जिल्ह्यात सर्व रिक्षा चालक मालक यांची परिषद घेऊन जनजागृती करावी. मीटर साठी मीटर ॲप वापरण्याची परवानगी द्यावी. अशा बऱ्याच मुद्द्यांवरती चर्चा करून तोडगा काढण्यात आला. तसेच लवकरात लवकर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, या जिल्ह्यातील रिक्षाचालकांच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व रिक्षा चालक-मालक यांचा संयुक्त मेळावा रत्नागिरीमध्ये घेण्याचे ठरविण्यात आले.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष प्रताप भाटकर तसेच त्यांचे सहकारी खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी शहर, लांजा, राजापूर या तालुक्यातील सर्व पदाधिकारी व रिक्षा चालक मालक यांनी मेहनत घेतली व मेळावा यशस्वी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स