ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किनारपट्टीवर ज्यांचा जन्म झाला व आयुष्य गेले त्यांचा उदरनिर्वाह किनारपट्टीवरच असणार ; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित)तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किनारपट्टीवर ज्यांचा जन्म झाला व आयुष्य गेले त्यांचा उदरनिर्वाह किनारपट्टीवरच असणार ; शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित)तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 27 Oct 2023 06:33 PM
वाचन संख्या 245

आचरा सार्वत्रिक निवडणूक, वैद्यकीय सुविधा, जि प शाळा यासंदर्भातही मांडले विचार.

मालवण तालुका शिवसेना शाखेतील पत्रकारांशी संवादा दरम्यान उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी, माजी नगरसेवक होते उपस्थित.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर किनारपट्टीवर, प्रशासना मार्फत अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मोहीमे संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित) तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. स्वतः मच्छीमार नेते असणारे हरी खोबरेकर यांनी,
‘किनारपट्टी भागातील मच्छीमार, इथल्या मातीत जन्मलेल्यांनी पर्यटन क्षेत्रात उतरून कष्टाने आपला रोजगार उभारला आणि किनारपट्टीवरच ज्यांचे आयुष्य गेले त्यांचा रोजगारही किनारपट्टीवर असणार आहे,’ असे स्पष्ट केले आहे. तात्पुरत्या स्वरूपातील त्यांच्या झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देण्याची गरज आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून मच्छीमारांना किनारपट्टीवरून कायमस्वरूपी हटविण्याचे काम केले जात आहे. यामुळे मच्छीमारांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सक्रीयपणे सहभागी होणार आहे. स्थानिक भुमीपुत्रांवरील अन्यायाच्या विरोधात आम्ही शासनाला आमच्या न्याय व हक्कांसाठी भंडावून सोडू असा इशाराही यादरम्यान तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला.

मालवण शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित) तालुका कार्यालयात एका पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी त्यांच्या सोबत उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत, सक्रीय शिवसैनिक नरेश हुले, युवासेनेचे सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, माजी नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर उपस्थित होते.

मच्छीमार समाज बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पिढीजात बांधलेल्या झोपड्या आज तोडण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना कोणी दिले हे रितसर कळायला हवे व आम्ही आजपर्यंत मच्छीमार बांधवांच्या आणि पर्यटन व्यावसायिकांच्या पाठिशी राहून त्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे असेही हरी खोबरेकर यांनी सांगितले. कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. कोणत्याही संघर्षामध्ये आम्ही पुढाकार घेऊ. मच्छीमार बांधव आणि पर्यटन व्यावसायिक ज्या ज्या वेळी आम्हाला साद देतील त्या त्यावेळी आम्ही पुढे उभे राहणार आहोत.आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही लोकांच्या मनातील उमेदवार असलेल्या मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने आम्ही या निवडणुकीत उतरलो आहोत. सर्व पक्ष एकत्रिपणे लढत आहेत. शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. टेमकर यांनी आजपर्यंत गावात खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचेच पॅनेल विजयी होणार असल्याचा दावा श्री. खोबरेकर यांनी केला.

यावर्षीच्या शिवतिर्थावरील ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा हा न भुतो न भविष्यती असाच झाला आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याचे आदेश या मेळाव्यातून दिला असल्याने शिवसैनिक यामुळे आता न्याय प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रशासकीय यंत्रणांतील जे अधिकारी जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार त्यांना सहकार्य करणे आणि जे अधिकारी मुजोरगिरी करतील आणि जनतेला वेठीस धरतील त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शिवसैनिक आक्रमकपणे आता लढण्यासाठी सज्ज झाला असल्याचे श्री. खोबरेकर यांनी सांगितले. सध्या सर्वत्र आरोग्य यंत्रणाही ढिसाळ असल्याचे निदर्शनास येत आहे. येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात अगर गोवा बांबुळी याठिकाणी हलविले जाते. एकही कायम वैद्यकीय अधिकारी याठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत नाही. आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून याठिकाणी प्रशस्त असे ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले असताना त्याठिकाणी एकही शस्त्रक्रिया अगर महिलांची प्रसुती केली जात नाही. यामुळे सध्या रूग्णालय व्यवस्थेची दुर्दक्षा झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या कालावधीत रुग्णांना आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि औषधांचा पुरवठा केला होता. आतातर औषधेही मिळताना कठिण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. प्राथमिक शाळा धनदांडग्यांच्या ताब्यात देण्यासाठी, खासगीकरण करण्यासाठी शिक्षणमंत्री प्रयत्नशिल आहेत तर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद करण्याच्याही घाट घातला जात आहे. यामुळे सध्याचे सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातून उतरलेले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाला आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचा विश्वास तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 448

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स