ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चंद्रग्रहणामुळे अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दिनक्रमात बदल.

प्रकाशन: 27 Oct 2023 06:41 PM
वाचन संख्या 137

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील कोजागिरी पौर्णिमेस अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अखेर घटस्थापना व देवीची प्रतिष्ठापना, आराधना, पारायण या धार्मिक विधी वटवृक्ष मंदिरात ज्योतिबा मंडपात प्रतिवर्षी होत असतात. विजयादशमीनंतर वटवृक्ष मंदिराच्या ज्योतिबा मंडपात कोजागिरी पौर्णिमेला प्रती वर्षाप्रमाणे यंदाही कोजागरी पौर्णिमा साजरी होणार होती, परंतु यंदा कोजागरी पौर्णिमेस खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दिनांक २८ ऑक्टोबर शनिवार रोजी पौर्णिमेस वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल करण्यात आल्याची माहिती पुरोहीत मोहनराव पुजारी यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली.

चंद्रग्रहणाच्या पार्श्वभुमीवर वटवृक्ष मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी ७ वाजता संपन्न होणारी देवीजींची इंद्रपुजा व दुधप्रसाद वाटपही इत्यादी धार्मिक कार्यक्रमही होणार नाहीत. शनिवार दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनीटांनी चंद्रग्रहणाचे वेध सुरू होतील. त्यामुळे शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ ची शेजारती व रविवार दि.२९ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ ची काकड आरती होणार नाही. तसेच स्वामी भक्तांचे अभिषेकही होणार नाहीत. ग्रहणमोक्षानंतर मंदीर स्वच्छता करून रविवारी सकाळी ११:३० ची नैवेद्य आरती नेहमीप्रमाणे संपन्न होवून पुढील दीनक्रम नेहमीप्रमाणे होतील.

शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होत असून सायंकाळ, रात्र व मध्यरात्री सह, दिनांक २८ ऑक्टोबरचीच रात्रीसह दिनांक २९ ऑक्टोबर रोजी दिवस उजेडायच्या आगोदर म्हणजेच रात्री ०१:०५ ते रात्री २:२३ मिनिटांपर्यंत चंद्रग्रहणाचा पर्वकाळ आहे. या काळात चंद्रग्रहणाचे स्पर्श रात्री १ वाजून ५ मिनिटांनी, ग्रहणाचे मध्य रात्री १ वाजून ४४ मिनिटांनी तर ग्रहणाचा मोक्ष रात्री २ वाजून २३ मिनिटाला असेल. या संपूर्ण चंद्रग्रहणाचा पर्वकाळ १ तास १८ मिनिटे असेल. चंद्रग्रहणचा हा पर्वकाळ साधारणतः मध्यरात्रीचा असल्याने दिनांक २८ ऑक्टोंबर व दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी सर्वसामान्य भाविकांना स्वामींचे दर्शन घेण्याकरिता काहीही हरकत नाही. त्यामुळे मंदिर नियमितपणे चालू राहील, परंतु या ग्रहण काळात आजारी मुले, मुली, वृद्ध, गर्भवती स्त्रीया यांनी ग्रहणाचे वेध संध्याकाळी ७ च्या पुढे पाळावेत असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स