ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचरा सार्वत्रिक निवडणुकीसाठी श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलने प्रचाराचे श्रीफळ वाढवले ; भाजपा - शिवसेना पुरस्कृत पॅनेल.

आचरा सार्वत्रिक निवडणुकीसाठी श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलने प्रचाराचे श्रीफळ वाढवले ; भाजपा - शिवसेना पुरस्कृत पॅनेल.

प्रकाशन: 27 Oct 2023 01:45 PM
वाचन संख्या 315

सरपंच पदाचे उमेदवार जेराॅन फर्नांडिस यांच्यासह सर्व उमेदवारांनी घेतले श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२३ साठी भाजपा – शिवसेना पुरस्कृत देव रामेश्वर ग्रामविकास पॅनेलचे प्रचाराचे श्रीफळ वाढवले गेले. काल २६ ऑक्टोबरला, श्री देव रामेश्वर मंदिरात जाऊन या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी दर्शन घेतले. यावेळी भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते धोंडी चिंदरकर व माजी उपसरपंच पांडुरंग वायंगणकर यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सरपंच पदाचे अधिकृत उमेदवार व माजी जि प सदस्य जेराॅन फर्नांडिस यांच्या सह पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, गणपत मिराशी, सारीका तांडेल, प्रियता वायंगणकर, मुजफ्फर मुज़ावर, प्राजक्ता देसाई, सायली सारंग, योगेश गांवकर, श्रृती सावंत, धोंडू कदम या अधिकृत उमेदवारांनी श्री देव रामेश्वराचे आशिर्वाद घेतले.

श्री संतोष गांवकर, श्री राजन पांगे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, अभय भोसले, विजय कदम, जयप्रकाश परुळेकर, किशोर आचरेकर, लवू घाडी, मंदार सरजोशी, सचिन हडकर यांच्या सह अनेकांनी उपस्थित राहून संपूर्ण पॅनेलला शुभेच्छा दिल्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स