ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर कालवश..!

कीर्तनकार श्री बाबा महाराज सातारकर कालवश..!

प्रकाशन: 26 Oct 2023 12:07 PM
वाचन संख्या 135

सहवेदना

मालवण | सुयोग पंडित : कीर्तनकार म्हणून मार्मिक शैलीतून भक्तीरसाचा जागर करणारे सुप्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचे आज नेरुळ येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ज्येष्ठ मार्मिक शैलीतील कीर्तनकार म्हणून ते ओळखले जात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात त्यांच्या कीर्तनाचे श्रवण केले जात होते. १९९० च्या दशकात दूरदर्शनच्या माध्यमातून त्यांच्या कीर्तनांचे प्रसारण होत असताना अनेक समाज प्रबोधनात्मक अध्यात्मिक चळवळींचा देखील उदय झाला होता. त्या दरम्यान त्यांचे ५ वर्षांचे नातू त्यांना कीर्तनात साथ देत असत हा सुद्धा बाल भक्ती व बाल संस्कारांच्या आकर्षणाचा विषय होता.

नेरूळ येथील त्यांचे निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी २७ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, बाबा माहाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी ३ नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखान्यासमोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतले होते. बाबा महाराज सातारकर यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभे राहता येत नसल्याने त्यांचे नातू चिन्मय महाराज सातारकर यांनी कीर्तन परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स