त्या तिघांना कमला पसंद आवडतं तर या तिघांना कमळापसंद ; दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची टीका.
मुंबई | ब्यूरो न्यूज : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळावा २०२३ मध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नांव न घेता विरोधकांवर टीका करताना एका जाहिरातितील अजय देवगण, शाहरुख़ ख़ान व अक्षय कुमार यांचा दाखला देत महाराष्ट्र राज्यातही असे तिघे आहेत जे दोन बोटं दाखवत ‘आमच्याकडेही असे दोन दोन हाफ’ असल्याचे सांगत असतात अशी टीका केली. त्यानंतर ते म्हणाले की जाहिरातितील तिघांना कमलापसंद आवडतं तर या तिघांना कमळापसंद आवडतं.
या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जरांगे पाटील यांचे धनगर समाजाला हाक दिल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)