ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर येथील सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्तीमत्व श्री भालचंद्र केळकर कालवश ; आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर यांचे वडिल होत.

चिंदर येथील सुप्रसिद्ध सामाजिक व्यक्तीमत्व श्री भालचंद्र केळकर कालवश ; आयपीएस अधिकारी सुब्रमण्य केळकर यांचे वडिल होत.

प्रकाशन: 23 Oct 2023 12:20 PM
वाचन संख्या 122

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर गावठणवाडी येथील पुरोहित तसेच आचरा दशक्रोशी ब्राम्हण मंडळ, मालवण तालुका ब्राह्मण मंडळाचे माजी अध्यक्ष, इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान समिती सदस्य, श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष भालचंद्र दत्तात्रय केळकर यांचे काल रविवारी २२ ऑक्टोबरला सायंकाळी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, बहिण, भावजया असा मोठा परिवार आहे. रविवारी रात्री चिंदर गावठणवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. आयपीएस अधिकारी म सुभ्रमण्य केळकर व मकरंद केळकर यांचे ते वडिल होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स