मालवणात विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन.
मालवण | सुयोग पंडित : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा परिषद आयोजित शालेय विभागीय टेबल टेनिस स्पर्धा २६ आणि २७ ऑक्टोबरला २०२३ रोजी जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या श्रीमती सुलोचना श्रीपाद पाटील मेमोरियल हाॅलमध्ये संपन्न होणार आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सांगली मनपा, सातारा, कोल्हापूर, कोल्हापूर मनपा, इचलकरंजी मनपा या विभागातील १४, १७ आणि १९ वयोगटातील मुलामुलींचे संघ यात भाग घेणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन जय गणेश स्कूल मालवण, महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्ग, मालवण टेबल टेनिस अकॅडमी श्री.विष्णू कोरगांवकर यांच्या मार्गदर्शन व देखरेखीत होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)