ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीत घरफोडी ; दिवसा उजेडी फोडून लुटल्या दोन सदनिका.

कणकवलीत घरफोडी ; दिवसा उजेडी फोडून लुटल्या दोन सदनिका.

प्रकाशन: 20 Oct 2023 04:57 PM
वाचन संख्या 208

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत दिवसा उजेडी खळबळजनक घरफोडी व लूटीचा प्रकार घडला आहे. शहरातील रामेश्वर प्लाझा मधील दुसऱ्या मजल्यावरील दोन सदनिकांमध्ये अज्ञातांनी आज दुपारी १२ ते १.३० च्या दरम्यान हे कृत्य केल्याचे सूत्रांकडून समजते आहे. इथले सदनिका रहिवासी डॉ. अशोक कदम यांच्या सदनिकेत कडीकोयंडा व कपाटाची तोडफोड करुन रोख रक्कम आणि काही तोळे सोन्याचा ऐवज चोरीला गेले आहे.

या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, पोलीस मिलिंद देसाई, आर. आर. राऊत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच ठसे तज्ञांचे पथक देखील रामेश्वर प्लाझा येथे आलेले आहे असे सूत्रांकडून समजते.

फोटो सौजन्य | कणकवली ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स