ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेश्मा पांढरे ठरली जिल्हास्तरावर अव्वल धावपटू ; मालवणच्या स. का. पाटील (सिंधुदुर्ग महाविद्यालय) संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी.

रेश्मा पांढरे ठरली जिल्हास्तरावर अव्वल धावपटू ; मालवणच्या स. का. पाटील (सिंधुदुर्ग महाविद्यालय) संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी.

प्रकाशन: 18 Oct 2023 10:36 AM
वाचन संख्या 195

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे १५ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत मालवणच्या स.का.पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. रेश्मा पांढरे हिने चमकदार कामगिरी केली. क्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजीत क्रीडा संकुल ओरोस येथे ही स्पर्धा संपन्न झाली. कु.रेश्मा रावबा पांढरे या खेळाडू विद्यार्थिनीने ८०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्ह्यात पहिला येण्याचा मान पटकावला असून त्यांची सांगली येथे होणाऱ्या विभाग स्तरासाठी निवड झाली आहे.

यशस्वी विद्यार्थिनीचे महाविद्यालयाच्या वतीने प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक व क्रीडा मार्गदर्शक प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. हर्षदा धामापूरकर, प्रा. स्नेहा बर्वे, प्रा.डॉ. हंबीरराव चौगले, प्रा. डॉ. एम. आर. खोत व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स