ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पंतप्रधानांचा मालवण दौरा हा राजकीय किंवा पक्षाचा दौरा ठरू नये तर कोकण विकासासाठीचा व्हावा ही अपेक्षा : मानवता विकास परीषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत.

पंतप्रधानांचा मालवण दौरा हा राजकीय किंवा पक्षाचा दौरा ठरू नये तर कोकण विकासासाठीचा व्हावा ही अपेक्षा : मानवता विकास परीषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत.

प्रकाशन: 18 Oct 2023 10:53 AM
वाचन संख्या 254

मसुरे | प्रतिनिधी : मानवता विकास परीषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्याबद्दल त्यांची अपेक्षा व भूमिका एका प्रसिद्धीपत्राद्वारे स्पष्ट केली आहे. कोकणचा विकास टप्प्याटप्प्याने होत असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे आणि माननीय पंतप्रधान हे मालवण दौऱ्यावरती येत असून यावेळी त्यांनी कोकणच्या विकासासाठी भरघोस निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धपत्रात केली आहे.

कोकणासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने रखडलेल्या योजनांसाठी व प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने कोकण भूमी सुजलाम सुफलाम होईल. कोकणच्या विकासामध्ये अनेक प्रश्न अजून बाकी आहेत. यामध्ये प्रामुख्याने सावंतवाडी रेल्वे टर्मिनस, वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग, मालवण बंदर, वेंगुर्लाबंदर, देवगड बंदर, सी वर्ल्ड प्रकल्प, सिंधुदुर्ग विमान सेवा असे अनेक प्रकल्प कोकण विकासाठी व पर्यटन विकासासाठी आवश्यक आहे. दुबई, सिंगापूर, मलेशिया यांच्या प्रमाणे देशाची आर्थिक प्रगती वाढीसाठी व बेरोजगारी दूर करण्यासाठी कोकणचा सर्वांगिण विकास निसर्गाचा समतोल राखून, त्वरित होणे आवश्यक आहे.

हा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिद्दीने करून भारताची जी डी पी मोठ्या प्रमाणात वाढवावी अशी मागणी मानवता विकास परिषद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांत सावंत यांनी केली आहे. ४ डिसेंबरला होणाऱ्या मालवण येथील कार्यक्रमात सर्व कोकणवासीयांना सामावून घेण्याची गरज आहे. हा कार्यक्रम राजकीय किंवा एखाद्या पक्षाचा ठरू नये तर कोकण विकासासाठी न भूतो न भविष्यती असा व्हावा अशी अपेक्षा श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स